भूम (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये गेम्स 24 तास फौंडेशन मार्फत 17 मुलींना सायकल बँक योजनेअंतर्गत सायकलचे वाटप करण्यात आले. गटशिक्षण कार्यालयांच्या वतीने दुसऱ्या टप्प्यात 17 मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तात्या कांबळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूसाहेब औताडे, भूम पोलीस स्टेशनचे  सलीम पठाण, बँक ऑफ इंडिया शाखा भूमचे मॅनेजर  राहुल गाडे  कॉन्ट्रॅक्टर ऋषी ढवळे उपस्थित होते. यावेळी सलील पठाण म्हणाले की,  मी ही जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असून शिक्षण घेत असताना पाच ते सहा किलोमीटर चालत जावे लागत असे.  आज तुम्हांला सायकल मिळाली आहे. प्रवासाची सोय झाली आहे. त्यामुळे तुम्ही याचा पुरेपुर उपयोग करून घेऊन अभ्यास करावा. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पायघन  यू. पी. यांनी केले. सूत्रसंचालन दत्ता गुंजाळ यांनी केले. यावेळी प्रशालेतील काका पवार, उत्तरेश्वर पायघन, पाटील डी. जी., पवार बी.एस., जोशी ए. टी., हरीश साठे, दत्तात्रय गुंजाळ व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.


 
Top