धाराशिव (प्रतिनिधी)-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची धाराशिव- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष  खा. सुनिल तटकरे, पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,कृषी मंत्री धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा व राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, पदवीधर आमदार सतीश चव्हाण  व इतर पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत संपन्न झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  धाराशिव उस्मानाबाद लोकसभा च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये घेण्यात आलेल्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  धाराशिवचे शेकडो, पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी यांना राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार साहेब यांनी मार्गदर्शन केले. धाराशिव लोकसभे च्या जागेसाठी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आग्रही असून ही जागा महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार लढेल व मोठ्या मताधिक्याने जिंकून येईल यासाठी आपण सर्वांनी मोठ्या उत्साहाने व जोमाने तयारीला लागावे. असे यावेळी अजितदादा यांनी उपस्थित पदाधिकारी यांना सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांनी आपण  धाराशिव लोकसभेची तयारी करीत आहोत, कार्यकर्त्यांची एकजूट त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम जिल्ह्यामधून करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव चे कार्यतत्पर  जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी आज आपला राष्ट्रवादी पक्ष जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष बनला असून याचा आम्हा सर्व पदाधिकारी यांना अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले तसेच पक्षाची काम करण्याची पद्धत आज सर्वांना माहीत झाली त्यामुळे पक्षांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित यांना सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी यांच्या नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार, कार्याध्यक्ष मा.खा.प्रफुल्ल पटेल व प्रदेशअध्यक्ष मा.खा.सुनील तटकरे  यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्त्या करण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष पदी ॲड.प्रवीण यादव व समीयोद्दीन गुलाम सिद्दीक मशायक, धाराशिव शहर कार्याध्यक्ष पदी पठाण अकबरखान गुलाबखान,जिल्हा सेवा दल सेल जिल्हाध्यक्ष पदी सतीश घोडेराव,आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष पदी नानासाहेब पवार यांची नियुक्ती करून नियुक्तीपत्र देण्यात आले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी धाराशिव जिल्हयातील विकास कामे व पक्ष बांधणी याबद्दल उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सोबत सविस्तर अशी चर्चा घडून आली. व पुढील काळात जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करावा व त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी आपण सदैव तयार आहोत असा विश्वास दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव चे जिल्हाध्यक्ष पद मिळाल्यापासून आज पर्यंत एकूण आठवा कार्य अहवाल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना अजितदादा पवार साहेब यांच्याकडे सादर केला. अजितदादा यांनी कार्यअवहाल पाहून जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांचे कौतुक व अभिनंदन करून अशीच प्रगती आपण करीत राहावे अशी शाबासकीची थाप त्यांना दिली. धाराशिव जिल्ह्यामधून प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार जिल्हाध्यक्षमहेंद्र काका धुरगुडे, प्रदेश सचिव गोकुळ शिंदे, पदवीधर प्रदेश कार्याध्यक्ष नितीन बागल,अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस खलील पठाण,युवक प्रदेश सरचिटणीस शंतनु खंदारे,धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड,लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे,कळंब तालुकाध्यक्ष शिवाजीराव लकडे,वाशी तालुकाध्यक्ष ॲड.सूर्यकांत सांडसे,भूम तालुकाध्यक्ष ॲड.रामराजे साळुंखे, तुळजापुर तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी,युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे,तुळजापूर शहराध्यक्ष महेश चोपदार,परंडा शहराध्यक्ष जावेद गौस खा पठाण, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज पठाण, पंकज स्वामी,भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष मलंग शेख,धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश नलावडे,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद खान पठाण, किसान सभा सेल जिल्हाध्यक्ष प्रकाश बावणे,महिला जिल्हा कार्याध्यक्ष अप्सरा पठाण,कळंब युवक तालुकाध्यक्ष अमर मडके,अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष मोहम्मद अबूबकर कोतवाल, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने,युवक जिल्हा सरचिटणीस शमसोद्दीन जमादार,तुळजापूर युवक शहराध्यक्ष श्रीनिवास नवले,तुळजापूर युवक तालुकाध्यक्ष नितीन रोचकरी,तुळजापूर युवक तालुका कार्याध्यक्ष समाधान ढोले, उमरगा सा. न्याय तालुकाध्यक्ष राहुल बनसोडे, तुळजापूर सा. न्याय तालुकाध्यक्ष विनोद जाधव, तुळजापूर विद्यार्थी तालुकाध्यक्ष सोहेल बागवान, धाराशिव विद्यार्थी तालुकाध्यक्ष सागर गाढवे,धाराशिव अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अरफात काझी, अल्पसंख्यांक शहर कार्याध्यक्ष समीर खतीब, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  धाराशिवचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 
Top