धाराशिव (प्रतिनिधी)-मागील 10 वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने केलेली सर्व क्षेत्रातील प्रगती तसेच देशाअंतर्गत घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे भारताची छबी जागतिक स्तरावर आणखीन उंचावली गेली आहे. याची कल्पना समस्त युवकांना असल्याची दिसून आली आहे. व येणाऱ्या काळात हा नवयुवा भारतीय जनता पार्टीच्या मागे खंबीर पणे उभा राहील असा विश्वास या वेळी त्यांनी दाखवला. तसेच येणाऱ्या काळात परत एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यासाठी युवा मोर्चा सक्षमपणे देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सरचिटणीस विक्रांत पाटील, युवाक प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, यांच्या मार्गदर्शनात काम करेल हा विश्वास आहे. असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी केले.

यावेळी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अजित कव्हेकर पाटील, करजखेडा येथील भाजप नेते लिंबराज साळुंखे, सरपंच सुधीर भोसले, दिलीप भोसले, मनोज साळुंखे, धनाजी साळुंखे, प्रसाद भरगंडे, महेश चव्हाण, इसाक शेख, सुरज चव्हाण, प्रशांत चव्हाण, विनोद साळुंखे, आदेश वाघे व गावकरी उपस्थित होते. तर धाराशिव येथील नानासाहेब पाटील, रोहित देशमुख, पपीण भोसले, स्वप्नील नाईकवाडी, गणेश इंगळगी, प्रसाद मुंडे, कुलदीप भोसले, धनराज नवले, जगदीश जोशी, अक्षय  विंचुरे, सुरज सगरे, नवनाथ सोलंकर व सहकारी उपस्थित होते.


 
Top