परंडा (प्रतिनिधी)- माजी सनदी अधिकारी तथा मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे भेट दिली. यावेळी परदेशी यांचा भाजपा परंडा तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, तालुकाध्यक्ष ॲड.गणेश खरसडे, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, न.प. गटनेते सुबोथधसिंह ठाकूर, जिल्हा चिटणीस राजकुमार पाटील, सुजित परदेशी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, अजित काकडे, बाबासाहेब जाधव, हनुमंत पाटील, धनाजी गायकवाड, परसराम कोळी, तानाजी पाटील, विठोबा मदने, लक्ष्मण गोरे, नागेश शिंदे, शरद कोळी, जयंत सायकर, गौरव पाटील, सुरज काळे, सारंग घोगरे, साहेबराव पाडुळे, रामदास गुडे, सुखदेव इंगळे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top