धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श कन्या प्राथमिक शाळा .इयत्ता सातवीच्या वर्गाचा स्वयंशासन दिन दिनांक 14 मार्च रोजी साजरा करण्यात आला.
यावेळी परिपाठापासून ते शाळा सुटेपर्यंतचे सर्व कामकाजाचे नियोजन वर्ग सातवीच्या मुलींनी पार पाडले. मुख्याध्यापिका अक्षदा पंडित व उप मुख्याध्यापिका ऋतुजा बारवकर तर विस्तार अधिकारी श्रेया अडसूळ यांनी कामकाज पार पाडले. विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छता करून घेणे, वर्ग नियंत्रण करणे, दिवसभर अध्यापन करणे, याचे प्रत्यक्ष अनुभव यातून मिळाले .विशेष म्हणजे इयत्ता पहिली ते तिसरी वर्गातील मुलींना क्रीडांगणावर घेऊन प्रत्यक्ष खेळाचे सादरीकरण करण्यात आले.
दुपारच्या सत्रात सर्वांचे स्नेहभोजन झाले यात अंडावडा, बटाटावडा, केळी व जिलेबीचे वाटप करण्यात आले. निरोपाच्या कार्यक्रमात शाळेतील दहा विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केल्या. पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळेबाबतच्या आठवणी जागवल्या. उपस्थितना श्री पुरी सर यांनी आयुष्यात स्पर्धा तीव्र आहे परंतु त्या स्पर्धेला सामोरे जाण्याची तयारी आपण ठेवावी व त्याची तयारी कन्या शाळेने करून घेतलेली आहे, असे विद्यार्थ्यांना सांगितले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळेसची ठळक बाब म्हणजे वर्ग सातवीच्या मुलींनी जवळपास साडेसहा हजार रुपये किमतीचे शाळेच्या सुसज्ज वाचनालयासाठी बुक कॉर्नर व कार्पेट भेट दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री रहेमान सय्यद सर, शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री जगन्नाथ धायगुडे सर, सातवीचे वर्गशिक्षक श्री देशटवाड संजय, सातवीच्या वर्ग शिक्षिका श्रीमती देशमुख अनिता यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक -शिक्षिकेने आपले मनोगत व्यक्त केले व कार्यक्रम पार पाडण्यास सहकार्य केले.