धाराशिव (प्रतिनिधी)-चालू शैक्षणिक वर्ष 2023- 2024 मध्ये सैनिकी स्कूल स्पर्धा परीक्षेसाठी शाळेतील एकूण 30 विद्यार्थिनी प्रवेशित झाल्या. सर्वच विद्यार्थिनी सैनिकी स्कूल परीक्षेमध्ये पात्र झाल्या आहेत व शाळेचा 100% निकाल लागला आहे.

28 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रीय स्तरावर सैनिक स्कूलची प्रवेश परीक्षा  लातूर येथे घेण्यात आलेली होती. या परीक्षेचा निकाल दिनांक 13 मार्च रोजी जाहीर करण्यात आला. जिल्हा परिषद आदर्श  कन्या प्राथमिक शाळेने अभूतपूर्व यश संपादित केले सैनिक स्कूल स्पर्धा परीक्षेत 100% निकाल देणारी ही राज्यातील पहिलीच शाळा असल्याचे बोलले जात आहे.   या यशामागे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी .राहुल गुप्ता यांनी राबवलेल्या 'मिशन स्कॉलरशिप ' या उपक्रमाचा बहुमोल फायदा झाला असे मनोगत व्यक्त करताना श्री.धायगुडे जगन्नाथ यांनी सांगितले . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षक सत्कार सर्व पालक यांनी पेन ,पुष्पगुच्छ, पुष्पहार व मानाचा फेटा देऊन करण्यात आला. परीक्षेतीलयशस्वी विद्यार्थिनींची नावे पुढीलप्रमाणे -

प्राची प्रकाश नरसिंगे 252, कादंबरी दत्तात्रय राठोड 251, वेदिका संभाजी कुंभार 248, सोनाली सतीश पौळ 245, समृद्धी वैभव टोणे 245, सिद्धी सच्चिदानंद कस्तुरे 240, कल्याणी विठ्ठल हिलकुटे 235, आरोही अशोक शिंदे 232, आदिती रमेश माळी 228, नंदिनी दीपक मते 228, स्वरा नितीन माने 228, रिया रवींद्र चौधरी 223, समीक्षा संदीप तांदळे 217, ईश्वरी किशन भिसे 214, सिद्धी अतुल सूर्यवंशी 212, कृपा जयसिंग राऊत 210, स्वराली नितीन सुतार 210, उत्कर्ष गोरोबा माळी 209, सायली बापू पवार 207, प्रांजली महादेव जमाले 201, सई प्रमोद  बाराते 200, संस्कृती धर्मराज शेंडगे 196, मानसी विजयकुमार शिंदे 195, पूर्वा सचिन शेळके 191, सिद्धी बाळासाहेब जाधव 190, प्रियांशी बंकट परसे 183, स्नेहा संदीप हुंबे 180, कार्तिकी महादेव राहिंज  162, प्रियानी लहू परसे 160, मैथिली राजेंद्र पानढवळे 148 शाळेत सैनिक स्कूल परीक्षा, नवोदय प्रवेश परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी सदरील शाळेत मागील 18 वर्षापासून दरवर्षी अतिशय काटेकोरपणे व नियोजनबध्द घेण्यात येते.

 परीक्षेतील यशस्वी विद्यार्थीनीची तयारी फेब्रुवारी 2023 पासून सकाळी 7:00 ते रात्री 8:00 वाजेपर्यंत कसल्याही प्रकारची सुट्टी न घेता, कसलाही मोबदला न घेता, विनामूल्य करण्यात आलेली आहे . सदरील परीक्षेचा सर्व अभ्यासक्रम माहे - सप्टेबर 2023 अखेर अतिशय काटेकोरपणे व नियोजनबध्द रित्या पूर्ण करण्यात आला. ऑक्टोबर महिन्यापासून ते परीक्षेपर्यंत विविध प्रकाशनच्या एकूण 35 सराव प्रश्नपत्रिका घेऊन प्रत्येक प्रश्न समजावून देण्यात आला हेच या यशाचे गमक आहे. या यशाचे खरे शिल्पकार हे अहोरात्र कष्ट घेणारे, नवोदय पॅटर्नचे जनक श्री. धायगुडे जगन्नाथ, श्री. पुरी शहाजी, शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शाळेचे कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर व कार्यक्षम मुख्याध्यापक सय्यद रहिमान हे आहेत.

सैनिकी स्कूल स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थिनींचे शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, शिक्षण प्रेमी नागरीक यांनी अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थीनी, सर्व शिक्षकवृंद व शाळेचे कौतुक गाव, तालुका व जिल्हा स्तरातून होत आहे.


 
Top