तुळजापूर  (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील वाढत्या नागरी समस्या,  तात्काळ जागेवर सोडता याव्यात या उद्देशाने मुख्याधिकारी श्रीमती प्रियंवदा म्हाडदाळकर यांच्या संकल्पनेतुन प्रभागनीय भेट देऊन जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कार्यक्रम निश्चित केला असून दिनांक 12 मार्च 2024 पासून या दररोज दुपारी 4-00 वाजता प्रत्येक प्रभागात भेट देऊन तेथील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी “नगरपरिषद आपल्या द्वारी“ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. 

तुळजापूर शहरातील नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करून आपल्या अडीअडचणी मांडाव्या शक्यतो विषय तात्काळ निकाली काढण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील.  या कार्यक्रमात सर्वांनी सहभाग नोंदवून मोहीम यशस्वी करण्यासाठी पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या अभियानाचा आरंभ  मंगळवार दि. 12 मार्च  प्रभाग  एस टी काँलनी -लोहिया नगर, पापनास झोपडपट्टी, पुजारी नगर, नळदुर्ग रोड. बुधवार दि. 13 मार्च   प्रभाग हाडको विश्वास नगर - संत सेवालाल नगर, आयोध्या नगर, धाराशीव रोड.  गुरुवार दि.14 मार्च  प्रभाग जिजामाता नगर कोंडो प्लॉटीग, लाटे प्लॉटींग, हाडको रस्ता. शुक्रवार दि. 15 मार्च   प्रभाग मंकावती गल्ली- साळूके गल्ली, आर्य चौक, महाद्वार रोड, कासार गल्ली, व नविन कन्या प्रशाला परिसर. सोमवार  दि. 18 मार्च प्रभाग खडकाळ गल्ली-लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर, भोसले गल्ली,  परमेश्वर वाडा. पावणारा गणपती परिसर. मंगळवार दि. 19 मार्च प्रभाग आरादवाडी भिमनगर -श्री. तुळजाभवानी मंदीर परिसर, कुंभार गल्ली बुधवार दि 20प्रभाग पंढरपूर गल्ली-भवानी रोड, पापनास गल्ली. (जवाहर चौक), गुरुवार दि. 21 मार्च प्रभाग रोहीदास नगर -भवानी रोड, बिडकर तलाव, वेताळ नगर शुक्रवार दि. 22 मार्च प्रभाग बजरंग नगर -घाटशीळ रोड, वासुदेव गल्ली, न.प.शा.क्र. 2, दिपक चौक. मंगळवार  दि. 23 मार्च  प्रभाग पूर्व मंगळवार पेठ- राउळ गल्ली, मुलान गल्ली, महाद्वार रोड, अतर्गत रस्ते. बुधवार दि. 24 मार्च  प्रभाग तुळजापूर खुर्दसारा गौरव, समर्थ नगर, गोपळ नगर, तुळजापूर (खुर्द).


 
Top