तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील देवसिंगा तुळजापूर येथील सतावीस वर्षिय युवकाने स्वताच्या शेतातील झाडास मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना  शुक्रवार दि. 1 मार्च रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आली.

योगेश संजय जाधव असा आत्महत्या केलेल्या मराठा तरुणाचे नाव आहे योगेश  मराठा आरक्षण आंदोलनात  सहभागी  असे  त्याचा या आत्महत्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.तुळजापूर तालुक्यातील  देवसिंगा तुळ  येथील  योगेश संजय जाधव 27 रा.हा मराठा आरक्षण आंदोलनात सातत्याने भाग घेत होता. माञ सध्याची परिस्थिती पाहुन  मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे व्यथित होऊन  शेतातील लिंबाच्या झाडास दोरीने  गळफास घेऊन  आत्महत्या केली.


 
Top