भूम (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तालुक्यातील हावळे कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 लाख रुपयाचा चेक हावळे कुटुंबीयांना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, तहसीलदार जयवंत पाटील, धनंजय सावंत, बालाजी गुंजाळ, बापू मोहिते, माजी नगराध्यक्ष झाकीर रंजीत साळुंखे आदी उपस्थित होते.

तालुक्यातील चिंचोली येथील तरुण अमोल अनिल हावळे यांनी दि. 24 नोव्हेंबर 2023 रोजी चिठ्ठी लिहून 'मी मराठा आरक्षण न दिल्यामुळे माझा जीव देत आहे अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती. हा तरुण मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय होता. त्याचा स्वतः चा मोटारसायकल गॅरेजचा व्यवसाय होता.

मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे नैराश्यामधून त्यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 लाख रुपये मंजूर झाले होते. ते पालकमंत्री सावंत यांच्या हस्ते देण्यात आले.


 
Top