धाराशिव (प्रतिनिधी)-तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथील राहिवासी कै. श्रीपती (तात्या )बाळू लांडगे वय 85 वर्ष यांचे  राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी शेतातून घरी आल्यानंतर आपल्या  नातू च्या हाताने चहा  घेतल्यावर थोड्याच वेळात प्राण सोडला. अंतविधी बारूळ ता. तुळजापूर येथे दिनांक 9-2-2024  रोजी सकाळी 10 वाजता अंतविधी संपन्न झाला. अंतविधी साठी  गावातील सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते.  त्यांच्या पश्चात दोन मुले,  मुलगी, सुना, नातू, नातसुना असा परिवार आहे. ते किसन लांडगे यांचे ते वडील होते.


शेतमजूर ते द्राक्षेबागायतदार 

कै. श्रीपती (तात्या) लांडगे हे शेतमजुरी करून आपली उपजीविका भागवत असत, तात्यांना दोन मुले व एक मुलगी , चार पत्राचे घर, मजुरी केल्या शिवाय घर चालत  नसे, अशा परस्थिती मध्ये दीर्घ आजाराने पत्नीचे निधन झाले.मुले लहान असल्यामुळे सर्व जबाबदारी तात्यावर पडली. अशा संकट समयी तात्या न घाबरता कष्ट करून, मुलाचे लग्न केले. मिळेल ती मजुरी करून, तात्यानी कष्टाचे सोने करून, द्राक्षे बाग उभा केली. आज ती बाग दिमाखात उभी आहे.


 
Top