धाराशिव (प्रतिनिधी) - मुख्य डाक कार्यालयातील कर्मचारी सचिन केशव जाधव यांचे शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी अल्पशा आजारांनी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

धाराशिव येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा श्रीपतराव भोसले हायस्कूलचे माजी कार्यालयीन अधीक्षक के.के. जाधव यांचे चिरंजीव होते. नाशिकचे पोलीस उपायुक्त  नितीन जाधव यांचे भाऊ तसेच जगप्रसिद्ध तबलावादक मुकुंदराज देव यांचे शिष्य होते. संगीतामध्ये विशारद होते.  
Top