धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते कारण जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांची निवड ही गुणवत्तेच्या आधारे झालेली असते , कॉन्व्हेंट स्कूल व इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मूलभूत सुविधा असतात परंतु गुणवत्ता नसते मुलभूत सुविधाकडे  सधन पालक आकर्षित होतात व खाजगी शाळेमध्ये मुलांना प्रवेश देतात खाजगी शाळेच्या धर्तीवरच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये देखील शौचालयासह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे असे सांगून  राज्यातील अनेक उच्चपदस्थ व्यक्ती या जिल्हा परिषद शाळेत शिकल्या आहेत असे मत धाराशिव कळंब तालुक्याचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने शिक्षक व कर्मचाऱ्यांना तालुका पुरस्काराच्या वितरण प्रसंगी व्यक्त केले.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजू शामराव कांबळे उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कैलास पाटील , जि. प. चे उपशिक्षणाधिकारी शिवाजीराव फाटक,  डायटचे प्राचार्य दयानंद जटनुरे , गटशिक्षणाधिकारी सय्यद असरार अहमद,  आदी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना आमदार कैलास पाटील यांनी सांगितले की,  राज्य सरकार च्या शाळा सीएसआर च्या माध्यमातून चालविण्यास देण्याचा निर्णय सरकार घेत आहे हा सरकारचा हा निर्णय चुकीचा असून त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागेल कारण त्यांना खाजगी शाळेतील महागडे शिक्षण शिक्षण परवडणारे नाही त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत असे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले.

 यावेळी धाराशिव तालुक्यातील एकूण 24 शिक्षक , माध्यमिक शिक्षक,  साधन व्यक्ती व शिक्षकेतर कर्मचारी आदींना तालुका पुरस्काराचे वाटप करण्यात आले.यामध्ये श्रीमती साळुंखे सारिका दत्तात्रय प्रा.शा. घाटंग्री ,श्रीमती अंबुरे बबीता अशोकराव प्रा.शा.सुर्डी, हिरे किशोर धोंडू प्रा.शा. धारूर,  विठ्ठल हनुमंत हाजगुडे प्रा.शा. शिंदेवाडी,  श्रीमती साळुंखे वनिता भाऊसाहेब प्रा.शा.आंबेवाडी , श्रीमती पांचाळ रंजना गणेशराव प्रा. शा.कनगरा , श्रीमती वर्षाराणी वसंतराव माळी प्रा.शा. समुद्रवाणी ,श्रीमती डावरे लुंबिनी ज्ञानेश्वर प्रा.शा.संत गोरोबा काका नगर ,श्रीमती अनिता प्रल्हादराव पांढरे प्रा.शा. तेर, श्रीमती बारसकर लिलावती गोपीनाथ प्रा.शा. रामवाडी, श्रीमती कोळी अंबिका चंद्रसेन के. प्रा. शा. तडवळा,  श्री चौरे रामभाऊ गोपीनाथ प्रा.शा. गोरेवाडी , श्रीमती नलावडे सविता विष्णू के. प्रा. शा. येडशी ,श्रीमती आरडले सोनाली भालचंद्र प्रा.शा.राजीव गांधी नगर, श्रीमती पटेल आसमा सलीम उर्दू प्रा.शा. ढोकी, श्रीमती राऊत ज्योती जनार्धनराव माध्यमिक शिक्षक जि. प. प्रशाला वडगाव सि., पारवे प्रकाश सिताराम विस्तार अधिकारी शिक्षण येडशी, जगदीश कृष्णाजी जागते  केंद्र प्रमुख तडवळा ( क ) नागटिळक अनुरथ राजाराम केंद्र प्रमुख उपळा (मा) , श्रीमती शिंदे उमा राजेंद्र कनिष्ठ सहाय्यक , वर्षा आप्पासाहेब पाटील , गटशिक्षणाधिकारी कार्यालय, लोखंडे नागनाथ बाबुराव साधन व्यक्ती,  वाकुरे सुनीता सोपानराव साधन व्यक्ती, किरदत्त अमोल बब्रुवान विशेष शिक्षक, लोमटे दशरथ आप्पाराव परिचर आदि शिक्षक , शिक्षकेतर कर्मचा-यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचा प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले , भारतरत्न डाँ सर्वपल्ली राधाकृष्णन व संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितीत मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सहशिक्षक विशाल सुरवसे यांनी , आभार यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता शिक्षण विस्तारअधिकारी श्री गिरी यांच्या पसायदानाने झाली कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गट शिक्षणाधिकारी सय्यद असरार अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तारअधिकारी श्रीमती दैवशाला हाके , श्रीमती अरुणा कांबळे तसेच सर्व विस्तार आधिकारी केंद्र प्रमुख व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


 
Top