परंडा (प्रतिनिधी) - संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी तसेच सग्यासोयऱ्यांबाबत अध्यादेश काढावा यासह विविध 9 मागण्यांसाठी पुन्हा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण चालू केलेले आहे. उपोषणाचा 7 वा दिवस असूनही शासन व प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून परंडा तालुका सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शुक्रवार दि.16 फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. यामुळे करमाळा, बार्शी, कुर्डूवाडी रोडची वाहतूक काही वेळा ठप्प झाली होती. यावेळी तालुका व शहरातील सकल मराठासह पाठिंबा म्हणून प्रमुख प्रक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top