धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हा शासकीय स्त्री रूग्णालयात कार्यरत असलेल्या परिचरिका रिबेका आनंद भंडारे यांना उत्कृष्ट आरोग्यसेवेबद्दल रोटरी क्लबच्यावतीने उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रोटरी क्लबच्यावतीने गुरूवार, 15 फेब्रुवारी रोजी रोटरीअंतर्गत सुरू असलेल्या अजमेरा नेत्र रूग्णालयाच्या सभागृहात हा पुरस्कार वितरीत करण्यात आला. कार्यक्रमास डॉ. रोहिणी काचोळे, रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. अनार साळुंखे, सचिव डॉ. मीना जिंतूरकर यांच्या हस्ते वितरीत परिचारिका रिबेका भंडारे यांना यंदाचा उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्कार देण्यात आला. भंडारे या मागील 27 वर्षांपासून परिचारिका म्हणून जिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय वाशी, उपजिल्हा रूग्णालय परंडा येथे रूग्णसेवा केली आहे. भंडारे यांना यापूर्वी बेस्ट वेल्फेअर अवॉर्ड, कोरोना सेवा पुरस्कार, आरोग्य महाशिबीरातील उत्कृष्ट सेवेबद्दल पुरस्कार मिळालेले आहे. त्यांच्या पुरस्काराबद्दल जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता सरोदे-गवळी, परिचारिका मराठे, माने, साळुंके, जाधव, खुने, प्रिती रूपनर, मस्के, मुंडे आदी कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.


 
Top