भूम (प्रतिनिधी)-आगामी लोकसभा निवडणुकीत कोणी कितीही वावड्या उडवल्या तरी धाराशिव लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीलाच सुटेल असे गृहीत धरून प्रत्येकाने गाव चलो अभियानच्या माध्यमातून दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. असे आवाहन ज्येष्ठ नेते इच्छुक संभाव्य उमेदवार ॲड. मिलिंद पाटील यांनी भूम येथे कार्यशाळेत बोलताना केले.
मंगळवार दि. 6 फेब्रुवारी 2024 रोजी भारतीय जनता पार्टीच्यावतीने केंद्र व राज्य शासनाच्या योजना गावागावात, घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी राबविण्यात येत असलेले गाव चलो अभियानचा आढावा घेण्यासाठी व काही महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी तालुक्यातील जबाबदारी दिलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्याची कार्यशाळा शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली.या कार्यशाळे दरम्यान भूम तालुक्यातील इट,भवानवाडी भागासह भूम शहरातील प्रमुख विशाल सरक, शरद चोरमले, नितीन सासवडे, सुरेश नारायण उपरेसह असंख्य युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी गांव चलो अभियानाचे जिल्हा संयोजक महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य अँड. मिलींद पाटील व सहसंयोजक रामदास कोळगे, 243 परंडा-भूम-वाशी विधानसभा निवडणूक प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, जिल्हा चिटणीस अंगद मुरूमकर, तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, सरचिटणीस संतोष सुपेकर, बालाजी बांगर, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष लताताई गोरे, महिला तालुका अध्यक्ष स्वाती तनपुरे, अश्विनी साठे, शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य रोहन जाधव, अ .जा.तालुका अध्यक्ष प्रदीप साठे, उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष चंद्रकांत गवळी, विधिज्ञ तालुका अध्यक्ष संजय शाळू, तालुका प्रसिद्धीप्रमुख शंकर खामकर, कामगार मोर्चा मराठवाडा सदस्य सचिन बारगजे, तालुका उपअध्यक्ष समाधान अंधारे, तालुका चिटणीस संतोष औताडे, अमोल बोराडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गणेश भोगील, मुकुंद वाघमारे, शांतीराज बोराडे, संदीप महानवर, श्रीपाद देशमुख, लक्ष्मण भोरे आदि उपस्थित होते.