कळंब (प्रतिनिधी)- गेल्या छत्तीस वर्षाच्या अध्यापन कार्यामध्ये आपण विद्यार्थी आणि समाजासाठी जे जे शक्य आहे ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे. सलग एकतीस वर्षे शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारत दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला आहे. एन.सी.सी. च्या माध्यमातून बाराशे विद्यार्थ्यांना राष्ट्र उभारणीसाठी तयार केले असून किल्लारीच्या भूकंपात एन .सी .सी .च्या माध्यमातून केलेली सेवा आजही अंगावर शहर आणणारी आहे. आज प्राचार्य म्हणून कार्यमुक्त होत असलो तरी यापुढेही जनसेवेचे कार्य सुरूच राहणार असल्याचे मत मेजर व्हि. एस. अनिगुंटे यांनी केले. ते कला व विज्ञान महाविद्यालय, नांदुरघाट येथे सेवापूर्ती समारंभाला उत्तर देताना बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ॲड. संतोष सावरगावकर हे तर प्राचार्य डॉ. गौतम पाटील, नितीन जाधव, प्राचार्य डॉ. बाबासाहेब हांगे, प्राचार्य डॉ. सुनील पवार, प्राचार्य डॉ. नरेंद्र माळी, प्रा. डॉ. दीपक गजहंस, प्रताप मोरे, ॲड. विवेक आंधळकर, गावचे सरपंच युवराज पाटील व डॉ. सौ. सुनंदा अनिगुंटे , डी.बी. गिरबने, सयाजी पाटील मानेजवळगेकर. यांची मंचावर प्रमुख उपस्थिती .
प्रा. डॉ. गजहंस म्हणाले की, अनिगुंटे यांचे भूगोलविषयातील योगदान, त्यांनी केलेली विविध पुस्तकाचे लेखन आमच्यासाठी व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे सांगितले. सचिव ॲड. सावरगावकर यांनी मेजर अनिगुंटे यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात महाविद्यालयाने केलेली प्रगती, नॅक मूल्यांकन, विविध विद्या शाखांची सुरुवात याबद्दलची त्यांचे कौतुक केले. यावेळी प्राचार्य डॉ. बाबासाहेब हांगे व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेश शिरसाट, प्रास्ताविक प्रा. डॉ. लक्ष्मण गीते तर आभार प्रा. डॉ. द्वारका गीते यांनी मानले. यावेळी प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व गावकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.