धाराशिव (प्रतिनिधी)-गवळी गल्लीतील धाराशिवचा महाराजा व मानाचा गणपती गणल्या गेलेल्या श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या रंगमंचकासमोर गणेश जयंती अत्यंत आनंदीमय व भक्तिभावाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. भक्तांच्या गर्दीने गणपतीच्या समोरील मोकळे मैदान खचाखच भरले होते गणेश जयंतीच्या निमित्ताने मंडळ गेली 61 वर्षापासून धाराशिवकारांची सेवा करीत आहे. भक्तांच्या भक्तीने व शक्तीने सेवा करण्याची संधी मंडळाला अखंडपणे आज तागायात चालू ठेवलेली आहे. मंडळाचे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. या खाऊ वाटपाच्या वेळी मंडळाचे संस्थापक सदस्य मनमत पाळणे, काशिनाथ दिवटे व प्राध्यापक गजानन गवळी यांच्या शुभहस्ते वाटप केले. 

पूजा विधीचा मान श्री व सौ शिव सपने श्री व सौ आकाश सुरवसे या नवदांपत्यांना मिळाला. यावेळी धाराशिव जिल्ह्याचे नाव आपल्या कार्यक्षेत्रात गौरवशाली परंपरेमध्ये उज्वल कार्य केलेल्या विविध व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. जयराज खोचरे, गौरव बागल, आकाश कोकाटे ,आलाउद्दीन सय्यद, शिंदे,पवार, कावरे इत्यादी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने धाराशिव शहरांमध्ये शिवराज्याभिषेक समिती युगप्रवर्तक समिती या पदाधिकाऱ्यांचा सन्मान, मरणोत्तर देहदान, वर्षातून तीन वेळा रक्तदान ,आज पर्यंत 25 वेळा रक्तदान करणारे दांपत्य श्री व सौ संजय धोंगडे,  एन डी ए स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन लेफ्टनंट पदी निवड झालेले ऋतुराज बदले यांचा सन्मान, सौभाग्यवती शकुंतला लगदिवे व श्रीमती  अव्वा यांचा अमृत महोत्सव जेष्ठ महिलांचा सन्मान मंडळाच्या वतीने श्रीफळ मंडळाच्या श्रीचं प्रतिमा, सन्मानपत्र  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपट असलेल्या शील्ड व मंडळाचा शेला देऊन यांचा सन्मान करण्यात आला. युवराज हुच्चे, विश्वास दळवी, दुर्गेश दिवटे, श्रीकांत दिवटे, विद्यानंद साखरे, अतुलढोकर, खंडेलवाल, मुझेमिल पठाण जावळे, सच्चिदानंद पोतदार, संजय पाळणे ,केदार उपाध्ये, वरून साळुंखे, मनोज अंजीखाने,बसवेश्वर पाळणे ,सुनील देवळे  ऋषिकेश चवडके ,रंजीत  बुरुंग, आकाश महामुनी, इत्यादीने परिश्रम घेतले व सत्कार यासंबंधीच्या हस्ते करण्यात आला. महिला मंडळाच्या वतीने अलका गवळी, उज्वला दिवटे, निर्मला गवळी, शकुंतला लगदिवे, गौरी कुलकर्णी, अनुराधा पाळणे, कल्याणी उपाध्ये, सरस्वती अंजीखाने, उषा चव्हाणके,नम्रता उच्च, ज्योती गवळी, स्नेहा दिवटे, यल्लमा बसगोंडा सुरेखा, पुष्पा हुच्चे, पाळणे, गवळी व लहान मोठ्या सर्व महिला मंडळांनी हा कार्यक्रम तीन तासाचा यशस्वी करण्यासाठी अत्यंत परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचलन आभार प्रा.भालचंद्र हुच्चे यांनी मानले.


 
Top