भूम (प्रतिनिधी)- शंकराराव पाटिल महाविद्यालय भूम येथे शिवजयंती महोत्सव निमित्त प्रा, नितिन कोळेकर यांचे व्याख्यान इतिहास, समाजशात्र, व  विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्रीकृष्ण. बी चंदनशिव उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून वि, वि मंडळ सहसचिव प्रा. संतोष एस. शिंदे, उपप्राचार्य डॉ. दयानंद व्ही. शिंदे, डॉ अनुराधा. एस जगदाळे उपस्थित होते. तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. नितिन कोळेकर उपस्थित होते. 

कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख व्याख्याते नितिन कोळेकर यांनी शिवपूर्व काळ व स्वराज्य या विषयावर मार्गदर्शन करताना छत्रपती शिवराय यांच्या जीवनावर चाहूबाजूनी प्रकाश टाकला. जीवनातील प्रत्येक घडामोडीकडे बघतांना त्याचा दृष्टीकोन सर्वत्तोम होता. शिवराय एक सर्व श्रेष्ठ मुत्सदी होते हे त्यांनी श्रोत्यांना पटवून दिले. 

त्यानंतर कार्यक्रम अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण बी. चंदनशिव यांनी अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रम वेळी महाविद्यालयतील प्रा. डॉ. के. जी. गव्हाणे, प्रा. तानाजी. आर बोराडे. प्रा. गौतम यू तिजारे, प्रा एन. डी पडवळ आदी सह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. नंदू आर. जगदाळे यांनी तर आभार प्रा. गोपाल एस. खंदारे यांनी केले.


 
Top