तुळजापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवार दि. 19 फेब्रुवारी रोजी आहे. ही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी गावोगाव शिवप्रेमींनी तयारी जोरदार सुरु केली आहे.

मराठा आरक्षण आंदोलन पार्श्वभूमीवर यंदा शिवजयंती न भूतो न भविष्यतो अशी साजरी होण्याचे संकेत मिळत आहेत. घरोघर, गावोगाव, गल्ली पासुन ते दिल्ली पर्यत साजरी करण्याची तयारी सुरु आहे.

शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव समित्या गठीत झाल्या असून, अनेक शिवजन्मोत्सव समितींचे अध्यक्षपदी मराठा व्यतिरिक्त इतर समाजातील अगदी मुस्लीम शिवप्रैमीची निवड झाली आहे. यंदा शिवजन्मोत्सव सोहळा हा सर्वजातीधर्माचे लोक ऐकञित येवुन साजरे करीत असल्याने शिवजयंती सोहळ्यात जातीच्या भिंती गळुन गेल्या आहेत. शिवजयंती साजरी करण्यासाठी पारंपारिक वाद्य वाजवणे तयारी सुरु आहे. आपल्या घरावर व दुचाकी, चारचाकीवर शिवरायांची प्रतिमा असलेला भगवा ध्वज लावण्यासाठी शिवप्रेमी बाजार पेठेत गर्दी करीत आहेत.तर राजस्थानसह अनेक राज्यातुन आलेले कलाकारांनी तयार केलेल्या  छञपती शिवाजी महाराज पुतळ्यांना अखेरचा हात फिरवत असुन सध्या मोठ्या शिवपुतळे विकले गेले आहेत. छोटे शिवमुर्ती नेण्यासाठी कारागिरांकडे शिवप्रेमी गर्दी करीत आहेत. शहरातील बाजारपेठ मध्ये शिवजयंती साजरी करण्यासाठी  लागणारे साहित्य खरेदीसाठी बाजार पेठेत शिवप्रेमींची मोठी गर्दी होत आहे.


 
Top