धाराशिव (प्रतिनिधी) - तालुक्यातील बेंबळी येथे कै धोंडीबा वाघे यांच्या पुण्यस्मरणार्थ ह भ प संदिपान हासेगावकर महाराज यांच्या हस्ते खंडोबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तर हभप वारकरी साहित्य परिषदेचे धाराशिव तालुकाध्यक्ष मोहन (आप्पा) वाघुलकर यांच्या पासष्टीनिमित्त 700 विठ्ठल मूर्तींचे वाटप करण्यात आले.

धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे कै. धोंडीबा वाघे यांच्या पुण्यस्मरणार्थ खंडोबा देवस्थान साठी 3 लाख रुपयांची खंडोबाची मूर्ती मोहन आप्पा वाघुलकर यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली. यानिमित्त दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी गावामधून दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. या दिंडीमध्ये जिल्हाभरातील हजारो वारकरी टाळ, वीणा व मृदंग घेऊन सहभागी झाले होते. तर रात्री हभप भागवत शिरवळकर महाराज (पंढरपूर) यांचे कीर्तन पार पडले. तसेच दि.25 फेब्रुवारी रोजी रात्री हभप खंडू भादेकर महाराज यांचे कीर्तन. तर दि.26 फेब्रुवारी रोजी आळंदी येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप संदिपान हासेगावकर महाराज यांच्या हस्ते खंडोबाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येऊन व रात्री किर्तन पार पडले. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संजय गिरवलकर, बंडू फस्के, हरिभाऊ सांगवे, हभप दादा सोनटक्के, बिरु वाघुलकर, दत्ता सुडके, सुखाप्पा सोनटक्के, विठ्ठल वाघुलकर, रामा वाघे आदींसह इतरांनी परिश्रम घेतले. यामुळे बेंबळी गाव व परिसर पूर्ण भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले होते.


 
Top