धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष  यांनी भेट देऊन रिड उस्मानाबाद या उपक्रमाबाबत आढावा घेतला. उपक्रमाबाबत शाळेत होत असलेल्या अभ्यासक्रमावर आधारित इंग्रजीत प्रश्न विचारले. इंग्रजी वाक्याचे मराठी मध्ये भाषांतर विचारले. सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय खेळीमेळी मध्ये प्रश्नांची उत्तरे दिली. गुणवत्ता पाहून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुलांचे कौतुक केले. इंग्रजी विषयाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी घोष यांनी मुलांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी इंग्रजी मधून संभाषण साधून विद्यार्थ्यांचे कौतुक शिक्षणाधिकारी पाटील, फाटक यांनी केले.

शाळेतील मुलांना रिड उस्मानाबाद अंतर्गत एनजीओकडून पुस्तके घोष यांच्या हस्ते भेट देण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत रीड उस्मानाबादचे जिल्हा समन्वयक पाटणकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अशोक, उपशिक्षणाधिकारी फाटक, केंद्र प्रमुख नागले उपस्थित होते.


 
Top