धाराशिव (प्रतिनिधी)- येथील लहुजी शक्ती सेनेकडून समर्थ भागवत डोलारे यांचा लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विष्णू कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली सरळ सेवा परीक्षेमधून कनिष्ठ लिपिक या पदावर निवड झाल्याबद्दल क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे चौकात भव्य सत्कार करण्यात आला. तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश प्रवक्ता प्रा. डॉ.मारुती अभिमान लोंढे, राज्य विधी सल्लागार प्रा.डॉ. विकास भोवाळ, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष मोरे, तालुका उपाध्यक्ष दीपक खंडागळे, ॲड वैभव एडके, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top