धाराशिव (प्रतिनिधी)-विश्ववंदनीय युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या शिवजन्मोत्सवानिमित्त शिवराज्याभिषेक सोहळा समिती, धाराशिव यांच्या वतीने अखंड महाराष्ट्राची सर्वात मोठी अशी दरवर्षीप्रमाणे दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथून मार्गस्थ होणाऱ्या मोटार सायकल रॅलीचे प्रमुख आकर्षण हे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे या महाशिवरॅलीचे नेतृत्व करणार आहेत.
ही रॅली परंपरेनुसार सकाळी ठीक 11:00 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून सुरुवात होऊन देशपांडे स्टॅन्ड, नेहरू चौक, काळा मारुती चौक, अंबाला चौक, लेडीज क्लब, जिजाऊ चौक, बसवेश्वर (सेंटर बिल्डिंग) चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सांगता होईल. या महाशिवरॅलीमध्ये धाराशिव शहर परिसर तालुका व जिल्ह्यातील सर्व शिवभक्त शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती लावावी असे आवाहन शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने सर्व जनतेस करण्यात येत आहे.