तेर (प्रतिनिधी)-  धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेची शैक्षणिक सहल गडकिल्ले, महाबळेश्वर, कोकण दर्शन करुन निर्विघ्नपणे सुखरूप मायभूमीत परतल्याबद्दल पालकांनी मुख्याध्यापीका, शिक्षक,शिक्षिका यांचा सत्कार करण्यात आला.                         .        

गणेश मगर,.अनिल बगाडे , जोतीराम भातभागे व  नारायण साळुंके  यांनी सपत्नीक  यांनी शाळेत येऊन शाळेच्या  मुख्याध्यापिका  सुरेखा कदम  शिक्षकवृंद वाघमारे,नरसाळे .क्षिरसागर ,पसारे,  गाढवे, पवार, जोगदंड,आशिष लोमटे,पांचाळ या सर्वांना मानाचा फेटा,शाल, श्रीफळ, पुष्प गुच्छ देऊन यथोचित सन्मान केला व शाळेतील सर्व विद्यार्थीनींना खाऊ वाटप केला.


 
Top