तेर (प्रतिनिधी)-अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने स्व-स्वरुप संप्रदाय व जिल्हा सेवा समिती, धाराशिव तालुका सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने  महारक्तदान शिबिराचे आयोजन धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले होते.या रक्तदान शिबीरात 80 रक्तदात्यानी रक्तदान केले .                                               

यावेळी तेर शिबीर प्रमुख अभिजीत सराफ व श्री संत गोरोबाकाका संतसंग सेवा समिती अध्यक्ष विजय चौगुले यांच्या हस्ते शिबिराची सुरुवात जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी तेर येथील आयोजित रक्तदान शिबीरात 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले . रक्तदान शिबीरासाठी तेर येथील श्री संत गोरोबा काका सेवा केंद्राच्या भक्त, शिष्य ,साधक यांनी परिश्रम घेतले.


 
Top