भूम (प्रतिनिधी)- विधान परिषद माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा वाढदिवस तालुक्यात विविध कार्यक्रमांनी साजरा केला.

बुधवार दि 21 फेब्रुवारी 2024 रोजी विधानपरिषद माजी आमदार तथा भुम परांडा वाशी मतदार संघाचे भूमिपुत्र सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसा निमित्ताने भूम येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.  

यावेळी तालुका प्रसिद्धी प्रमुख पत्रकार शंकर खामकर यांच्या काव्य वाचनाच्या तडक्याने विद्यार्थी टवटवीत झाले होते. सर्वांनीच मनसोक्त टाळ्यांचा प्रतिसाद दिला तर एका विद्यार्थिनीने छत्रपतीं शिवाजी महाराज जयंतीचे निमित्त साधून आपल्या भावना व्यक्त करून सर्वांना मंत्रमुग्ध केले . सर्वांचे लक्ष वेधून घेतले

यावेळी भुम परांडा वाशी विधानसभा निवडणुक प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा चिटणीस अंगद मुरूमकर, तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, अ.जा.मोर्चा  तालुका अध्यक्ष प्रदीप साठे, शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, युवा नेते शरद चोरमले, गजेंद्र धर्माधिकारी, बाबासाहेब गायकवाड, दादा गायकवाड, हेमंत देशमुख, प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, विधीज्ञ संजय शाळू, शांतीराज बोराडे, लक्ष्मण भोरेसह असंख्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


 
Top