धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय लष्करात तब्बल वीस वर्ष देशसेवा करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तुळजापूर येथील यांत्रिक विभागात सहाय्यक यांत्रिक कारागीर म्हणून चौदा वर्ष कार्यरत असलेले यु. एम. साठे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार विभाग नियंत्रक श्रीमती चेतना राजेश खिरवाडकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या सुविदय पत्नी सौ. अनिता साठे  व इतर सात सेवानिवृत बांधव आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. तर तुळजापूर येथे पार पडलेल्या त्यांच्या सत्कार सोहळ्यात तुळजापूर  विभागाचे आगारप्रमुख शिंदे साहेब व भाजपा पदाधिकारी आनंद कंदले यांनी एसटी बसची प्रतिकृती, तुळजाभवानीची प्रतिमा देऊन सत्कारित केले. या कार्यक्रमाचे आयोजन तुळजापूर आगारातील नितीन घंदुरे, के. एम. पवार, एम. दंगापुरे, जे.बी. शिरसट, माने अजित, सागर कदम, किरण नलावडे, हरी सुरवसे, रामहरी क्षीरसागर, महेश पांडागळे, अविनाश पवार, बापू पैलवान व इतर यांत्रिक कर्मचारी वृंदांनी  केले होते.


 
Top