धाराशिव (प्रतिनिधी)-मुख्यमंत्रही एकनाथ शिंदे यांच्या बुधवार तेरणा साखर कारखान्यावर होणाऱ्या सभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. शिंदे यांच्या या सभेतून शिवसेना शिंदे गट लोकसभा मतदार संघावरील दावा आणखी प्रबख करणार आहे. शिंदे यांच्या सभेची जादू झाली तर भाजपाला मतदार करण्याची अपेक्षा बाळगून असलेल्या संघ परिवाराच्चा भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्यासमेवत झालेल्या बैठकीत परिवारातील नेत्यांनी भाजपलाच लोकसभेची जागा असावी असा भक्कम आग्रह केला होता.

ढोकीच्या तेरणा साखर कारखान्यालगत मुख्यमंत्री शिंदे यांची बुधवारी सभा होणार आहे. या दृष्टीने शिवसेनेसह महायुतीकडून सभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. सुमारे एक लाख लोक जमवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात येत आहे. तत्पूर्वी गेल्या काही दिवसापासून पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचयासह सर्वच नेते लोकसभा मतदार संघावर आपलाच दावा सांगत आहे. सांवत यांनी तशी तयारीही सुरू केली आहे. त्यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांचे भावी खासदार म्हणून पोस्टरही झळकले होते. आता शिंदे यांच्या सभेतून डॉ. सावंत आपला मतदार संघावरील दावा आणखी पक्का करणार आहेत. 

मागील अनेक महिन्यापासून भाजपमध्येही हीच जागा लढवण्याची उत्सुकता दिसत आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री मिश्रा यांनी संघ परिवारातील कार्यकर्त्यांसोबत तब्बल तीन तास वार्तालाप केला होता. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या नेत्यांनी मिश्रा यांच्याकडे भाजपकडे जागा घेण्याची अपेक्षा व्यक्त केल्याची चर्चा होती. मागील 40 वर्षात कधीही कमळावर मतदान करण्याची संधी मिळाली नाही. यावेळी तरी मिळावी, अशा शब्दात आग्रह केल्याची चर्चा होती. मात्र आता शिंदे गटाच्या प्रबख दावेदारीमुळे जागा कोणाच्या पारड्यात पडणार, यांचा निर्णय महायुतीचे प्रमुख नेतेच ठरवण्याची शक्यता आहे.


 
Top