तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील खंडाळा येथील सुभेदार अरुण भागवत पवार हे देशरक्षणार्थ विविध ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर भारतीय सैन्य दलातून 28 वर्षाची सेवा करून सेवानिवृत्त झाल्यानिमित्त ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि 2.) गौरव सोहळा घेत त्यांचा सत्कार केला. तसेच गावातून ढोल ताशे व बॅन्ड पथकाच्या गजरात भव्य मिरवणूक काढून ग्रामस्थांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सुभेदार अरुण पवार हे हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. 31 जानेवारी रोजी ते उधमपूर येथे सेवानिवृत्त झाले. 

2 फेब्रुवारी रोजी ते आपल्या मूळ गावी खंडाळा येथे येणार असल्याने गावकऱ्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. खंडाळा येथे आगमन होताच शिवशंकर तरुण मंडळ, गावातील नागरीक, व्यावसायीक, शाळा, ग्रा.पं.कार्यालय, विविध संघटना, अधिकारी पदाधिकारी यांनी त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पहाराने स्वागत केले. तेथुन ढोल, ताशे व बँड पथकाच्या गजरात राष्ट्रभक्तीपर गीतांच्या निनादात त्यांच्या राहत्या घरापर्यंत वाजत, गाजत मिरवणुक काढण्यात आली. गल्लोगल्ली गावातील महिलांनी रांगोळी काढुन औक्षण करीत स्वागत केले. याच कार्यक्रमा दरम्यान ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य असा नागरी सपत्नीक असा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर खंडाळा गावातील आजी माजी सैनिकांचा देखील यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पहार देवुन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक भुजंग दादा पवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा मजूर फेडरेशन चे अध्यक्ष नारायण नन्नवरे डॉ किरण पवार, उपसरपंच विशाल पवार, ग्राम पंचायत सदस्य पंडित ढवण हे उपस्थित होते. गावकऱ्यांच्या वतीने झालेला अनोखा सत्कार पाहून अरुण पवार भारावून गेले. यावेळी सत्काराला उत्तर देतांना ते म्हणाले की, सेवानिवृत्ती नंतरचे  माझे जीवन  गावातील तरुणांना देशसेवा, राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी व एकोपा निर्माण करण्यासाठी कार्य करीन, असे सांगितले.  कार्यक्रमाला त्यांच्या पत्नी सौ ज्योती पवार यांच्यासह कुटुंबातील तसेच गाव व परिसरातील बहूसंख्य ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी, माजी सैनिक, अधिकारी, पदाधिकारी, आजी सैनिक असा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होते. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अंकुश पवार गुरुजी यांनी केले तर आभार नितीन ढवण यांनी मानले  कार्यक्रमाच्या यशस्वेीतेसाठी समस्थ ग्रामस्थ व शिवशंकर तरुण मंडळाच्या सदस्यांनी प्रयत्न केले.


 
Top