धाराशिव (प्रतिनिधी)- येथे रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2023 -24 या वर्षातील विविध गुणवंतांचा सन्मान करून त्यांना प्रमाणपत्र दि.09 फेब्रुवारी 2024 रोजी वितरित करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे हे असणार आहेत. सदर कार्यक्रम डॉ.गणपतराव मोरे शिक्षण उपसंचालक लातूर विभाग,लातूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी दिली.महाविद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थी व गुणवंतांना या पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी केले आहे.