भूम (प्रतिनिधी)- तालुक्यात विविध ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली. भूम येथील भीमनगर, रमाई नगर येथे माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली. 

रमाई नगर येथे महिलांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी लक्ष्मी कांबळे, कौशल्या बनसोडे, शांता सोनवणे, कावेरा टेकाळे,  माजी नगरसेवक सारिका थोरात, सरोजा शिंदे, सरिता शिंदे, ललिता पायाळ, पूनम धावारे, माया बनसोडे, सुप्रिया धावारे, सुलभा दावणे, आशा पालके, अर्चना सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी पूजा पाठ बौद्धाचार्य आर. के.सुकाळे यांनी केले. यावेळी महादेव पायाळ, विलास शिंदे, युवराज ओव्हाळ, जीवन बनसोडे, माजी सैनिक वंदनकुमार लांडगे, एल. टी. शिंदे, मेघराज गायकवाड, विनायक मस्के, प्रताप लिंगमोरे, सिद्धार्थ सोनवणे, प्रणील शिंदे, सुनिल थोरात, भगवान शिंदे यांच्यासह बौद्ध अनुयायी होते.


 
Top