धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव - कळंब विधानसभा मदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मा. कैलासदादा घाडगे पाटील यांचा वाढदिवस रविवारी (दि.25) विविध सामाजिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

आमदार कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी धाराशिवचे ग्रामदैवत श्री धारासुरमर्दिनी मंदिरात अभिषेकपूजा व महाआरती करण्यात आली. तसेच हजरत ख्वाजा शमसोद्दिन गाजी दर्ग्यात चादर अर्पण करण्यात आली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश सोमाणी यांच्या वतीने जिल्हा स्त्री रुग्णालयात आज जन्माला आलेल्या बालकांना ड्रेस आणि माताना साडीचोळीचे वाटप करण्यात आले. तसेच टायगर ग्रुपच्या वतीने गौस तांबोळी यांच्या पुढाकारातून भारत टॉकीज परिसरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले.

या सर्व कार्यक्रमांसाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतिश सोमाणी माजी नगराध्यक्ष  दत्ता बंडगर, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, शहर संघटक प्रशांत साळूंके, रवि वाघमारे, गणेश खोचरे, तुषार निंबाळकर, राजाभाऊ पवार, बाळासाहेब काकडे, नितिन शेरखाने, अंकुश मोरे, गौस तांबोळी, विक्रम पाटील, नाना घाडगे, देवानंद एडके, गणेश साळुंके, सुनिल वाघ, अफरोज पिरजादे, मुजीब काझी, संकेत सुर्यवंशी, अजिंक्य राजेनिंबाळकर, ॲड. मनोज शेरकर, वैभव वीर, अजित बाकले, आकाश मुंगळे, पिंटू आंबेकर, विश्वजीत गुरव, यशवंत शहापालक, राकेश सुर्यवंशी, प्रवीण केसकर, संग्राम बागल, राकेश कचरे, महेश लिमये, ओंकार बांगर, सतिश लोंढे, मुकेश चौगुले, छोटा साजीद, कलीम कुरेशी, शहाबाज पठाण, असद रझवी, बड्डू शेख, गणेश राजेनिंबाळकर, प्रशांत जगताप, सत्यजीत पडवळ, प्रज्वल कोळी, भैय्या पांचाळ, अभिषेक पाटील, गणेश असलेकर, सुनिल गायकवाड, विभागप्रमुख सौदागर जगताप, अमोल मुळे, शिवरत्न भालशंकर, बालाजी जाधव, सुधीर जाधव, किरण बोचरे उपस्थित होते.


 
Top