परंडा (प्रतिनिधी) -“उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी यांच्या वतीने मिशन आनंदी फेज - 2 अंतर्गत स्तन कर्करोग व गर्भाशय ग्रीवा कर्करोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. 

सदरील शिबीरात रुग्णांची तपासणी करण्यात आली. सदरील शिबीरात वैद्यकिय अधिकारी डॉ.अबरार पठाण  व डॉ.अभीजीत खरटमल यांनी शिबीरात सर्व रुग्णांना कर्करोगाबद्ल माहिती दिली. कार्यक्रमात स्तन कर्करोग, गर्भाशय ग्रीवा कर्करोग तपासणी करण्यात आली. डॉ लंकेश्वर, डॉ.साळुंके, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ.विक्रांत राठोर ,समुपदेशक मकरंद वांबुरकर, गुंजाळ तानाजी, अधिपरिचारिका अंबुजा महामुनी चव्हाण, विभुते, रत्नपारखे, औषधनिर्माण अधिकारी ओव्हाळ अधिपरिसेविका रुपाली सौताडेकर, एस. वाय कुलकर्णी, केसकर एस, नागेश रनखांब, जगदाळे ज्योती, इतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


 
Top