तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्याच्या अखेरच्या टोकावर असणाऱ्या काटगाव परिसरात मनरेगाच्या विहरी जेसीबी पोकलँन्ड यंञाच्या माध्यमातून केल्या जात असल्याने दुष्काळात मजुरांना मजुरी मिळणे मुष्कील झाले आहे.हा प्रकार मजुरांन साठी दुष्काळात तेरावा महिना ठरत आहे. तुळजापूर तालुक्यात काटगाव परिसरात मनरेगा विहरी माध्यमातून जलसंधारण विभागाच्या तांञीक मजुंरी सह  अनेकांनी  आपले उखळ पांढरे करुन घेतले आहे.

सध्या या परिसरात  चालु असलेले विहरीचे काम यंञ्याचा सहाय्याने केली जात आहेत. याकडे  रोजगार सेवक सह मनरेगा अभियंत्यांच्या दुर्लक्षा बाबतीत वेगळीच चर्चा ऐकावयास मिळत आहे हे कमी कि काय म्हणून यंञाने विहरी करण्यासाठी याच प्रक्रीयेतील मंडळी सक्रिय असुन यंञधारक कडुन ही ते आपले उखळ पांढरे करुन घेत आहे.या सर्व प्रक्रियेला स्थानिक लोकप्रतिनिधीचे सहकार्य असल्याची चर्चा आहे. सध्या रोजगार हमी काम कमी अर्ध तुम्ही अर्ध आम्ही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या विहर कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणारे कंञाटी असल्याने ते दुसरी कडेच लक्ष अधिक देत आहेत त्यामुळे काटगाव परिसरातील  मनरेगा कामे संशयाचा भोव-यात सापडले आहेत. जे यंञे विहर खोदत आहेत त्यांच्या मालकांवर कारवाई केली तरच मजुरांचा हाताला काम मिळणार आहे. काटगाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असल्याने व तेथुन पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हयाची हद्द सुरु होत असल्याने या कामांनवर लक्षठेवणे अधिकारी वर्गास कठीण जात असल्याने याचा लाभ स्थानिक सेवक व हाताखालची अधिकारी पुरेपुर घेत आहेत.


 
Top