भूम (प्रतिनिधी)-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भूम शहर सार्वजनिक शिव जन्मोत्सव कमिटी भूमच्या वतीने कमला भवानी ब्लड बँक करमाळा यांच्या समवेत नागोबा मंदिर येथे गुरुवारी रक्तदान शिबिर पार पडले. युवकांच्या उत्स्फूर्त या रक्तदान शिबिराला प्रतिसाद लाभला रक्तदान शिबिरामध्ये 124 रक्तदाता यांनी रक्तदान केले आहे. या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने शिवभक्तांनी सहभाग नोंदवला होता.शुक्रवार 16 फेब्रुवारी रोजी ह. भ.प.सुशेन महाराज नाईकवाडे (शिवचरित्रकार ) यांचे कीर्तन नगरपरिषद समोर नागोबा चौकात आयोजित केलेले आहे. तसेच शनिवारी 17 फेब्रुवारी 2024 रोजी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, व मूकबधिर शाळेत खाऊ वाटप, ग्रामीण रुग्णालयात  फळे वाटप केली जाणार आहेत. रविवार 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 10:00 वाजता भव्य दिव्य शिवजन्म पाळणा आयोजित केला आहे. त्यानंतर 19 फेब्रुवारी ला सकाळी 09:00 वाजता शिवप्रतिमेचे पूजन व भव्य रॅली कल्याण स्वामी मठ येथून निघणार आहे.

 त्यानंतर संध्याकाळी 4:00 वाजता श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक कल्याण स्वामी मठ येथून भूम शहरात निघणार आहे. यात विशेष आकर्षण  वारकरी पथक,विराट हलगी ग्रुप लातूर,घोडे पथक भूम,अभिजित सूर सनई वाद्य पार्टी माळशिरस,रनगन्धर्व ढोलीताशा पथक बार्शी, या जयंती महोत्सवात मोठ्या संख्येने शिवभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन भूम शहर सार्वजनिक शिव जन्मोत्सव सोहळा कमिटी (कल्याण स्वामी मठ ) यांनी केले आहे.


 
Top