परंडा (प्रतिनिधी) - परंडा येथील जि.प.उर्दू उच्च माध्यमिक शाळेत गुरुवार दि.15 रोजी स्वयं शासन दिन 10 वी व 12 वीच्या विद्यार्थी, विद्यार्थींनीचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमावेळी 10 वी व 12 वी च्या मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच 10 वीची आदर्श विद्यार्थीनी कुमारी पठाण सालेहा जमील व 12 वी ची कुमारी सादिया जमाल मुजावर यांना पारितोषक देऊन गौरव करण्यात आले.
या कार्यक्रमा दरम्यान जि.प.उर्दू प्रशाळे चे मुख्यध्यापक खतीब ए.ए,श्रीमती दखनी समीना मैडम, जमील बांगी सर, शेख मुस्तफा सर, शिंदे महेंद्र सर,श्रीमती अंजलि चंदनशिवे मॅडम, तसेच या कार्यकम्राचे अध्यक्ष म्हणून जमील पठाण तर प्रमुख पाहुणे म्हणून इरफान शेख, समीर पठाण (एस. के.) माजी मुख्याध्पक खान सर,उस्मानभाई सय्यद,बिलाल मौलाना , पालक इरफान शेख आदी उपस्थित होते.