धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील अग्रेसर असणारी रूपामाता अर्बन क्रेडिट सोसायटीच्या मुख्य शाखेचा 20 वा  वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

खातेदार व सभासद यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर  रूपामाता अर्बन चौफेर प्रगती करत आहे. ग्राहकांना उत्तम प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न यापुढेही राहील असे संस्थापक- चेअरमन ॲड. व्यंकटराव गुंड यांनी सांगितले 

यावेळी संचालक श्री. शंकर गाडे, रूपामाता अर्बन क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सत्यनारायण बोधले, रूपामाता मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मिलिंद खांडेकर, सरव्यवस्थापक श्री.विजयकुमार खडके, प्रशासकीय अधिकारी श्री.विशाल गुंड, शाखा व्यवस्थापक श्री. पवन जमाले, संचालक,सभासद,हितचिंतक, कर्मचारी, ठेवीदार उपस्थित होते. मान्यवरांनी रूपामाता अर्बन क्रेडिट सोसायटीच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.


 
Top