परंडा (प्रतिनिधी) - तहसील कार्यालय परंडा व गटशिक्षण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यांचे उद्घाटन व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपदक व प्रशस्तीपत्र तसेच या उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय स्पर्धेसाठी, पर्यवेक्षक, परीक्षक, स्पर्धा प्रमुख, स्पर्धा समन्वयक, सदस्य म्हणून कामगिरी  केलेल्या सर्व शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घन:श्याम अडसूळ तहसीलदार परंडा हे होते.  पांडुरंग माडेकर नायब तहसीलदार परंडा यांचे याप्रसंगी मतदार जनजागृती कार्यक्रम व मराठी भाषा संवर्धन या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून  सूर्यभान हाके शिक्षण विस्तार अधिकारी, सुभाष वसंतराव जगताप  संस्थापक मुख्याध्यापक, भाऊसाहेब सूर्यवंशी स्पर्धा समन्वयक,  बळीराम गंगणे स्पर्धा संयोजक, पत्रकार मुजीब काझी, प्रकाश काशीद,आदिसह पालक, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना तहसीलदार अडसूळ म्हणाले, लोकशाहीच्या बळकटी करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सजग असणे आवश्यक आहे. भारतीय निवडणूक आयोगाची रचना व कार्य समजून घेऊन, कर्तव्य भावनेने सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. विविध उदाहरणाद्वारे नागरिकांना त्यांनी आपली कर्तव्य व जबाबदारी याची जाणीव करून दिली.मातृभाषा मराठीच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यासह पालकांनी शिक्षकांनी व समाजाने सातत्याने प्रयत्न करायला हवेत, याचबरोबर पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सुद्धा पार पाडली पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी आपल्या व्याख्यानातून  माढेकर यांनी बाराव्या शतकापासून आजच्या काळापर्यंत प्राचीन व ऐतिहासिक उदाहरणे सांगून माहिती दिली. त्यांनी आपल्या व्याख्यानात ज्ञानेश्वरी मधील विविध ओव्यांचे उदाहरण देऊन स्पष्टीकरण सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी तर बहारदार सूत्रसंचालन  बळीराम गंगणे यांनी केले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थिनी अमृता लालगे हिने लोकशाही बळकटीकरणासाठी युवकांची भूमिका या विषयी व सोनाली थोरात हिने मनोगत व्यक्त केले.भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खालील शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

दीपक काटकर प्रशाला सिरसाव, सतीश खरात प्रशाला परंडा ,दिनकर साबळे गटशिक्षण कार्यालय परंडा ,भाऊसाहेब सूर्यवंशी  जिल्हा परिषद कन्या प्रशाला परांडा. मुरलीधर धारकर,भैरवनाथ विद्यालय कंडारी, बळीराम गंगणे रावसाहेब पाटील शाळा परंडा, अमोल अंधारे जिल्हा परिषद शाळा कौडगाव,पल्लवी चव्हाण. जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा परंडा, शुभांगी देशमुख जिल्हा परिषद कन्या प्रशाला परंडा,मीनाक्षी नकाते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोहकल,संभाजी धनवे रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा, संजीव मुसळे ,जिल्हा परिषद शाळा रोहकल, शंकर  अंकुश रा.गे.शिंदे  महाविद्यालय परंडा,सुनील महामुनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुक्कडगाव,सतीश शिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिराळा ,सारीका हेगडकर गटशिक्षण कार्यालय परंडा ,बाबासाहेब पाचकुडवे गटशिक्षण कार्यालय परंडा,विजयकुमार माळी जिल्हा परिषद शाळा कौडगाव,गणेश भाग्यवंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंडारी ,बाळासाहेब घोगरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोंजा शशिकांत माने जिल्हा परिषद प्रशाला परंडा, सुषमा  गोरे गटशिक्षण कार्यालय परंडा ,सूर्यभान हाके गटशिक्षण कार्यालय परंडा ,महादेव विटकर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा परंडा.श्रीमती प्रार्थना पाटील रावसाहेब पाटील शाळा परंडा, अशोक वडतिले रावसाहेब पाटील शाळा परंडा, रामचंद्र इंगळे जि प प्रशाला परंडा, तानाजी मिसाळ जि. प. प्रशाला परंडा, सारिका बेडके ग.शि.अ.कार्यालय, आबासाहेब घावटे प्रा. एा. पाचपिंपळा या सर्वांना प्रमाणपत्र देऊन  गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वसंत सक्राते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पाटील व्ही एन,पौळ, एस एस. जाधव, बी. ए. येमले, अशोक वडतीले, संगीता पाटील, बळीराम गंगणे, वसंत सक्राते, प्रार्थना पाटील,श्रीमती देशमुख, श्रीमती वाघमारे यांनी परिश्रम घेतले.


 
Top