परंडा (प्रतिनिधी) - परभणी जिल्ह्यातील पुर्णा येथे आयोजित मराठवाडा राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यशाळेत डॉ.राहुल देशमुख यांना उत्कृष्ट ग्रंथपाल म्हणून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव अंतर्गत शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय परंडा येथील ग्रंथपाल डॉ.राहुल किशनराव देशमुख यांना नुकताच मराठवाडा विभागीय संघ आणि स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय पूर्णा जिल्हा परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी पूर्णा येथे मराठवाडा राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेमध्ये ज्येष्ठ कवी प्रा. डॉ. इंद्रजीत भालेराव, माजी आमदार गंगाधर पटणे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र कुंभार, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथील प्राचार्य डॉ. नंदकुमार दहिभाते, विभागीय सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉ.सुनील हुसे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर येथील माजी ग्रंथपाल डॉ. धर्मराज वीर, पूर्णा येथील डॉ. भन्ते उपयुक्त महाथेरो व अकोला येथील राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन काटेवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. राहुल देशमुख यांना राज्यस्तरीय उत्कृष्ठ ग्रंथपाल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

डॉ. राहुल देशमुख यांना मिळालेल्या या यशामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांनी संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने स्टाफ सेक्रेटरी तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे, प्रा. डॉ. संतोष काळे, प्रा. डॉ. विशाल जाधव, प्रा. विजय जाधव, प्रा. रणजीत वर्पे यांची उपस्थिती होती.



 
Top