धाराशिव (प्रतिनिधी)- त्याग मुर्ती माता रमाई यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त फुले शाहु आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील जिल्हा परिषदेच्या अधिनस्त व फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित मोकळ्या जागेत माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम पिंपळ वृक्षाखाली (बोधी वृक्ष) घेण्यात आला. कार्यक्रमास अंकुश (अण्णा) उबाळे, बाबासाहेब बनसोडे,धनंजय वाघमारे, स्वामीनाथ चंदनशिवे, गणेश रानबा वाघमारे, संजय गजधने, संग्राम बनसोडे,बलभीम कांबळे, संपतराव शिंदे,अन्य इतर उपस्थित होते.


 
Top