तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे प्लेसमेंट सेल विभागाच्या आणि आय.बी.एफ कौशल्य विकास केंद्र कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मेजर डॉ प्रोफेसर यशवंतराव डोके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्लेसमेंट सेल विभागाचे प्रमुख प्रा जी.व्ही बाविस्कर यांच्या पुढाकाराने भव्य असा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी आय.बी.एफ प्रमुख विवेक अजमाने यांनी आलेल्या विद्यार्थ्यांना जॉब प्रोफाईल बाबत माहिती दिली.सदर प्रसंगी एकुण 80 विद्यार्थी उपस्थित होते,तर 70 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन टेस्ट दिली, यापैकी 25 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.कार्यक्रमासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ नेताजी काळे, सदस्य प्रा.व्ही.एच चव्हाण, ग्रंथपाल प्रा डी आर निकाळजे,प्रा.अमोल भोयटे यांचे उत्तम सहकार्य लाभले.तुळजाभवानी महाविद्यालयात प्रतिवर्षी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते, रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून महाविद्यालयातील माजी विद्यार्थी, तसेच इतर विद्यार्थ्यांना सुध्दा मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार प्राप्त होतो.श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे रोजगार उपलब्ध करून देणारे तुळजाभवानी महाविद्यालय हे एक अग्रगण्य महाविद्यालय मानले जाते.आज नोकरीची निकड पहाता तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तुळजाभवानी महाविद्यालय सतत प्रयत्नशील असते अशी प्रतिक्रिया मुलाखतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी दिली.


 
Top