उमरगा (प्रतिनिधी)- पूणे शहरात जेष्ठ पत्रकार निखील वागळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, अँड. असीम सरोदे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा उमरगा तालुका पत्रकार बांधवांनी शनिवारी (दि.10) निषेध व्यक्त करून हल्लेखोरावर कडक कार्यवाही करण्याच्या मागणीने तहसीलदार गोविंद येरमे यांना निवेदन देण्यात आले. 

या संदर्भात तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांची शासकिय विश्रामगृहात बैठक झाली. बैठकीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात करण्यात आला. तेथुन सर्व पत्रकारांनी काळ्या फिती लावुन तहसीलदार येरमे, पोलिस निरीक्षक डी.बी. पारेकर यांना निवेदन देण्यात आले. हल्लेखोरावर कडक कार्यवाही करावी अन्यथा पत्रकार संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर पत्रकार अविनाश काळे, नारायण गोस्वामी, समीर सुतके, बालाजी वडजे, देविसिंग राजपुत, अमोल पाटील, अंबादास जाधव, गो. ल. कांबळे, युसूफ मुल्ला, सुभाष जेवळे, आकाश पोतदार, शरद गायकवाड, विकास गायकवाड, संभाजी पाटील, महादेव पाटील, महेबुब पठाण, अमोल गायकवाड, विशाल देशमुख, माधव सुर्यवंशी यांच्या सहया आहेत.


 
Top