भूम (प्रतिनिधी)-मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या अमर उपोषणाच्या समर्थनार्थ भुम येथे सायंकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

उपोषणास पाठिंबा देत सकल मराठा समाज बांधवांनी आरक्षणासंदर्भात तात्काळ कायदा करून आरक्षण द्यावे. दरम्यान अमर उपोषण करते मराठा योद्धा मनोज जरंगे यांची तब्येत खालावत असल्याने आंदोलनाची धग सर्व भूम तालुका परिसरात वाढत आहे. जरांगे यांच्या जिवाचे बरे वाईट बरे वाईट झाल्यास या सरकार सर्वस्वी जबाबदार राहील अशी मागणी यावेळी करण्यात आली. आज शहरातील आठवडी बाजार असल्याने रस्ता रोको ठिकाणी दुतर्फा वाहनांची रांग लागली होत्या. आज भूम येथील आठवडी बाजार असल्याने व अचानक पणे गोलाई चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन केल्याने एकच गडबड उडाली. बस स्थानकातील अनेक बसेस आगारात जमा करण्यात आल्या. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत गोलाई चौकात सर्वत्र वाहनाच्या रांगाच लागलेल्या होत्या.

 
Top