धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्यावतीने 2019 ला दावा केला होता. त्यावेळी माझी माहिती अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविली होती. विशेष म्हणजे मला उमेदवारी देण्यासाठी सर्वजण सकारात्मक असतानाच धाराशिव लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सुटला. अशी माहिती भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

2014 ला तुळजापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सुटला होता. शिवसेनेच्यावतीने मला उमेदवारी दिली गेली. तत्कालीन मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या विरोधात तगडी लढ दिली होती. त्यापूर्वी 1989 साली धाराशिव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्यावतीने तत्कालीन मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी लढलो असेही सुधीर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 2014 साली धाराशिव जिल्ह्यात 375 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. ही गोष्ट मनाला खटकत होती. त्यामुळे शेतकरी आत्महत्या बचाब जनजागरण दिंडी अचलबेट ते सोनारी काढली.आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराला मी वैयक्तिक 50 हजार रूपये मदत केली. काही परिवारातील मुले शिक्षणासाठी दत्तक घेतली. याप्रमाणे माझे कायम काम चालू आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी खरा दावेदार मीच आहे असे सांगून सुधीर पाटील यांनी गुत्तेदारी करणारे विकास कामे केले म्हणत उमेदवारी मागत आहेत असे सांगून शिंदे शिवसेनेचा दावा या मतदारसंघावर योग्य असला तरी या मतदारसंघात भाजप निवडणूक लढविण्यास सक्षम आहे. 

यावेळी विजय देशमुख, रामभाऊ बांगर, सतीश देशमुख, तानाजी पाटील आदी उपस्थित होते.


विकासाचे राजकारण

जिल्ह्यात सध्या विकासाचे राजकारण न करता श्रेय वादाचे राजकारण चालू झाले आहे. पीकविम्याचा सरकारी पैसा जरी मिळाला तरी माझ्यामुळेच मिळाला असे सांगितले जाते असे सांगून सुधीर पाटील यांनी भाजपमध्ये घराणेशाही चालत नाही. शहरातील रस्त्यासाठी आलेले 300 कोटी रूपये श्रेय वादाच्या राजकारणातून परत गेल्याची टिका सुधीर पाटील यांनी केली. 13 वर्ष धाराशिव जिल्ह्याकडे पाटबंधारे विभागाचे मंत्रीपद होते. खर तर त्याचवेळी विविध सिंचन योजना राबवून पूर्ण जिल्हा सिंचनयुक्त करणे अपेक्षित होते. डीसीसी बँकेविषयी बोलताना बँक बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळणे बंद झाले. त्यांच्या ठेवी मिळणे बंद झाल्या. त्यामुळे अखेर शेतकरी आत्महत्या करत असल्याचीही टिका सुधीर पाटील यांनी केली. 


 
Top