परंडा (प्रतिनिधी) - राष्ट्रीय सेवा योजना विभागाने जी उद्दिष्टे दिली ती केवळ कागदावर न राहता अमलात आणली पाहिजेत विद्यार्थ्यांमध्ये सेवाभावी वृत्ती निर्माण झाली पाहीजे  सूक्त गुणांना वाव मिळावा ज्ञानवृत्ति व्यक्तीमत्व विकास  अशा अनेक उद्दिष्टाने विद्यार्थी विकसित झाले पाहिजेत असे मत परंडा तहसीलचे तहसीलदार घनश्याम अडसुळ यांनी आंदोरा तालुका परंडा येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.ते शिबिराचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव उपस्थित होते .

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर आणि शिक्षण महर्षी गुरुवर्य  रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष श्रमसंस्कार शिबिर सक्षम युवक सक्षम सक्षम भारत गुरुवाक दिनांक 8 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.संत गाडगेबाबा व कै.रा.गे.शिंदे गुरुजी यांच्या प्रतिमाचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले . राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा अमरसिंह गोरे पाटील ,प्रा डॉ कृष्णा परभणे तर सहकार्यक्रमाधिकारी म्हणून प्रा डॉ अरुण खर्डे, प्रा डॉ शहाजी चंदनशिवे, प्रा डॉ सचिन चव्हाण, प्रा डॉ सचिन साबळे यांनी शिबिराचे आयोजन केले आहे.या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर तहसीलदार घनशाम अडसूळ, प्राचार्य डॉ सुनील जाधव, उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने,सरपंच रेखाताई शिंदे , प्रा डॉ डी व्ही शिंदे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत गोपने, सुरेश बारस्कर, नीलकंठ शिंदे, पंचायत समिती माजी सभापती लिंबराज शिंदे , सौ सुषमा नितीन शिंदे, पंचायत समिती सदस्य सिद्धार्थ विद्यालयातील सहशिक्षक बाबुराव गायकवाड, जिल्हा परिषदेचे शिक्षक जगताप, सामाजिक कार्यकर्ते रविराज गोपने , माजी सरपंच गुलचंद सोलंकर, सिद्धार्थ विद्यालयाचे शेख, ग्रामपंचायत सदस्य शहाजी बारस्कर , श्रीमंत गोपने आदींची उपस्थिती होती.

या शिबिरामध्ये वरिष्ठ कला वाणिज्य विज्ञान विभागाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा डॉ गजेंद्र रंदील, प्रा डॉ अरुण खर्डे, प्रा डॉ विद्याधर नलवडे, प्रा डॉ संतोष काळे, प्रा डॉ कृष्णा परभणे, प्रा डॉ वैशाली थोरात, प्रा डॉ अक्षय घुमरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ कृष्णा परभणे यांनी केले सूत्रसंचालन प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले.यावेळी प्रा डॉ डी व्ही शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.पुढे बोलताना तहसीलदार धनश्याम अडसूळ म्हणाले की संस्कार हे लहानपणीच होतात जन्मापासून मरेपर्यंत प्रत्येक अवस्थेमध्ये माणूस शिकतो परंतु विविध अवस्थेमध्ये शिकण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वप्रथम शिक्षण महत्वाचे आहे आणि ते शिक्षण या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरा मार्फत दिले जाते ते विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे.शेवटी अध्यक्ष समारोप प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी केला. 

या शिबिरामध्ये ग्रामस्वच्छता जलसंवर्धन वृक्षारोपण व संवर्धन, व्यसनमुक्ती , व्यक्तिमत्व विकास, रक्तदान शिबिर नव मतदार जनजागृती ,आरोग्य तपासणी व बालविवाह प्रतिबंध जनजागृती असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.तसेच बापू जबडे प्रोटेक्शन ऑफिसर जिल्हा महिला बाल विकास कार्यालय अभय केंद्र परांडा यांनी बालविवाह प्रतिबंध जनजागृती या विषयावर, प्रा डॉ गजेंद्र रंदील यांनी महात्मा फुलेंचे सामाजिक कार्य प्रा डॉ हरिश्चंद्र गायकवाड यांनी ग्रामविकासात युवकांचे योगदान या विषयावर प्रा डॉ तुळशीराम उकिरडे तेरणा  महाविद्यालय धाराशिव यांनी सातत्यपूर्ण परिश्रम हाच यशाचा राजमार्ग या विषयावरती स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत.कार्यक्रमाचे आभार प्रा डॉ सचिन चव्हाण यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.


 
Top