धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पशुसंवर्धन पदविका जिल्हाध्यक्षपदी डॉ. गोविंद जोगदंड यांची निवड करण्यात आली. धाराशिव येथील राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेस पार्टी कार्यालय येथे गुरुवारी (दि.8) जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी ही निवड करण्यात आली.

यावेळी संजय पाटील दुधगावकर म्हणाले की, जिल्ह्यातील पशुसंवर्धन पदविका विभागातील तरुणांचं काम शेतीपूर्वक जोडधंदा असणाया पशूंची चिकित्सा करणे असल्याने मुक्या जनावरांची सेवा करणारी ही डॉक्टर मंडळी अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यासाठी हे संघटन डॉ. जोगदंड यांनी चांगलं उभाराव अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी डॉ. सुरज गवळी, डॉ. अक्षय हजारे, डॉ. प्रज्वल कांबळे, डॉ. ताडेकर, धम्मपाल गायकवाड, वाजिद पठाण, शेखर घोडके, संजीत वरपे, गणेश गडकर, औदुंबर धोंगडे, अशोक बिरंजे, आकाश अंधारे, संतोष काळदाते, सनी गायकवाड, भैय्याजी मुळे, गुणाजी तेलंग, सागर पाटेकर, समाधान गाडे, ॲड. प्रवीण शिंदे, विठ्ठल माने, मनोहर हरकत, भीमराव आगारे, बंडू नव्हाट, शिवाजी गोडगे, जीवन काळे, विठ्ठल नव्हाट, रामचंद्र माने, औदुंबर माने, भारत देवकर, रामराजे काळे, दत्ता गुंड, कृष्णा गंभीरे, अजित पांढरे, सूर्यकांत माने, गणेश शेंडगे, बाळासाहेब जाधव, नानासाहेब नलावडे, दत्तात्रेय जाधव, अनिल जाधव, बालाजी डोंगरे, जीवनराव बर्डे आदींची उपस्थिती होती.


 
Top