परंडा (प्रतिनिधी) - येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला  अंतरंग फाउंडेशन तर्फे मुलीना करियर जाणीवा विषयक प्रमाणपत्र वाटप  करण्यात आले. 

शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षात फाउंडेशन तर्फे तासिका आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामध्ये इयत्ता 10 वी नंतर करियर साठी कोणती शाखा निवडावी  त्यामधील विविध संधी यासाठी आवश्यक पात्रता याविषयी माहिती देण्यात आली.मार्गदर्शन सत्र संपल्यानंतर मुख्याध्यापक  दिनकर पवार , प्रशालेतील  माध्यमिक शिक्षक  भाऊसाहेब सुर्यवंशी व महादेव नागटिळक  यांच्या हस्ते  इयत्ता 9 वी व 10 वी मधील मुलीना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. अंतरंग फौंडेशन चे मार्गदर्शक शिक्षक महादेव नागटिळक यांचा प्रशालेच्या वतीने चंद्रकांत सुरवसे यांनी सत्कार केला.आभार प्रदर्शन व सूत्रसंचलन  भाऊसाहेब सुर्यवंशी सर यांनी केले.


 
Top