धाराशिव (प्रतिनिधी)-वाद विवाद होवून अखेर येरमाळा पोलिसांनी गुटखा वाहतूक करणाऱ्या गाडीवर कारवाई केली आहे.

पोलीस ठाणे येरमाळा हद्दीत पेट्रोलिंग करत असताना कुलकर्णी यांचे पेट्रोलपंपाचे पुढे एनएच 52 रोडवर येरमाळा ब्रिजच्या चौकात येरमाळा ते धाराशिवकडे येणारे वाहन क्र. एमएच 12 एचडी 3477 आयशर टॅम्पो हे वाहन दिसून आल्याने नमुद वाहनास पेट्रोलिंग दरम्यान चेक केले. त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला. यातील आरोपी अब्दुल बाबुमियॉ मुखीद, वय 38 वर्षे, रा. बाबुमियॉ बेकरी अतनुर, गुलबर्गा, कर्नाटक याचे ताब्यात नमुद वाहनात गोवा गुटखा एकुण 33 पोते मिळून आला. अंदाजे 26 लाख 88 हजार रूपये किंमतीच्या माला सह आयशर वाहन अंदाजे 4 लाख किंमतीचा असा एकुण 30 लाख 88 हजार रूपये किंमतीचा माल मिळून आला. माल जप्त करुन आरोपी विरुध्द पोलीस ठाणे येरमाळा येथे गुरनं 33/2024 भा.द.वि. सं. कलम 328, 272, 273, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


संतोष काळेचा आरोप

सदर गाडी अडविण्यासाठी दोन पोलिसांनी सांगितले होते. तुम्ही गाडी आडवून बाजूला व्हा, आम्ही बघतो काय करायचे ते असे पोलिसांनी सांगितले होते.  असे सांगून संतोष लाला काळे यांने पत्रकारांशी बोलताना पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी पारधी समाजातील मुलांना गुन्ह्यापासून दूर ठेवत आहेत. समाज सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे असताना त्या दोन पोलिसांनी आमच्या मुलांचा वापर केला. ज्यावेळेस गाडीत गुटखा आहे हे समजल्यानंतर मुलांनी गाडी अडवून ठेवली. त्यानंतर पोलिस व मुलामध्ये वाद ही झाला असे संतोष काळे यांनी सांगितले. 


 
Top