धाराशिव (प्रतिनिधी)-तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा.लि. या कारखान्यास 16 ते 31 जानेवारीपर्यंत गाळपासाठी आलेल्या ऊसाचे 2800 रुपयाप्रमाणे बिल संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.धाराशिव बँकेत जाऊन आपल्या खात्यावरील बिल घ्यावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.
धाराशिव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गरज ओळखून जागजी शिवारात बालाजी उर्फ नानासाहेब पाटील यांनी जागजी शिवारात एनव्हीपी शुगर या कारखान्याची उभारणी केली आहे. विशेष म्हणजे एनव्हीपी शुगर या कारखान्याला चाचणी गळीत हंगामात शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.गाळप सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांनी ऊस दिल्यानंतर पंधरा दिवसांत संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात ऊसबिल जमा करण्यात येत आहे.
चाचणी गळीत हंगाम सुरु झाल्यापासून गाळपास आलेल्या ऊसाची रक्कम पंधरा दिवसांच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे. त्यामुळे चाचणी हंगामातच एनव्हीपी शुगर कारखाना शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरला आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी यांचा ऊस गाळप करून शेतकऱ्यांचे हित एन व्ही पी कारखान्याने जोपासले आहे.आता 16 ते 31 जानेवारीपर्यंत गाळपासाठी आलेल्या ऊसाचे देखील 2800 रुपयाप्रमाणे बिल ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या शाखेत जमा करण्यात आलेले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी दिली.