भूम (प्रतिनिधी)- भूमकडून पाथरूडकडे दुचाकीवरून जात असताना ऊळूप गावाजवळच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाच्या कठड्याला जाऊन धडकल्याने अमोल राजेभाऊ बोंदार्डे  (वय 32 ) रा. ईट, ता. भूम हा दुचाकीचा युवक कारागीर गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय भूम येथे दाखल केले. त्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय धाराशिव येथे पाठवण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. त्याचे तेथेच शवविच्छेदन करण्यात आले. ही घटना दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली. त्यानंतर मूळ गावी ईट येथे दुपारी चार वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुचाकीचा एक चांगला फिटर अशी त्याची ओळख होती. त्याच्या या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे.

 

 
Top